महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचंड विजय झाला आहे. महायुतीला २३० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला मिळून ४९ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पराभवाचं विश्लेषण करताना एक गणित मांडलं. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना एक पोस्ट करत लगेच उत्तर दिलं. तसंच लोकसभेतल्या पराभवाचं एक गणित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मांडलं आणि शरद पवारांनी जनतेची दिशाभूल करु नये असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका.
जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला २०२४ च्या लोकसभेत काय झाले ते पाहू, भाजपाला मतं १,४९,१३,९१४ आणि जागा ९, पण काँग्रेसला मतं ९६,४१,८५६ आणि जागा १३. शिवसेनेला ७३,७७,६७४ मतं आणि ७ जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला ५८,५१,१६६ मतं आणि ८ जागा. २०१९ च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला ८७,९२,२३७ मतं होती आणि १ जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला ८३,८७,३६३ मतं होती आणि जागा ४ आल्या. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे.
अशी पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून त्यांनी शरद पवारांच्या गणिताला गणितानेच उत्तर दिलं आहे. तसंच किमान शरद पवारांनी जनतेची दिशाभूल करु नये अशी विनंती केली आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1865403722769052090?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1865403722769052090%7Ctwgr%5Ee78d236b33b9314256b68a9054940edad3b33e3c%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fdevendra-fadnavis-answer-to-shard-pawar-shares-the-number-of-bjp-votes-in-loksabha-and-ask-this-question-scj-81-4757201%2F