अलीकडेच पाच राज्यांच्या निवडणूक पार पडल्या ज्यात भाजपला तीन राज्यात तर काँग्रेसला एक राज्यात यश मिळालं आहे. या निवडणुकीला लोकसभेची सेमीफायनल असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. अशातच पुन्हा देशात मोदी यांचं सरकार येणार असं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत होतं. यातच एक नवीन सर्वेक्षण समोर आलं आहे. ज्यात राज्यात भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसताना दिसत आहे.
एबीपी न्यूज आणि सी व्होटरने हा सर्वेक्षण केला आहे. या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात राज्यात एनडीए आघाडीला 19-21 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेस आघाडीला 26-28 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”मी प्रत्येक सर्व्हेचा सन्मान करतो. पण लक्ष्यात ठेवा, कुठलाही सर्वे असुद्यात हवा फक्त मोदी यांचीच आहे. आम्ही राज्यात 40 लोकसभा जागा पार करणार म्हणजे करणारच.” पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. यावर इतरही नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.