राज्यात पार पडणाऱ्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपने पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये भाजपने नेत्या पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. याशिवाय सदाभाऊ खोत परिणय फुके यांनाही संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 12 जुलै रोजी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी केंद्राने जाहीर केलीय, याचा आनंद आहे. पंकजाताईंना विधान परिषदेत स्थान दिले जावे,असा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता. तो भाजप केंद्रीय समितीने मान्य केला. त्याबद्दल मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर पंकजा मुंडेंबाबत आनंद व्यक्त करताना फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हटले, हिंदूंचा अपमान केला. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. आम्ही त्याचा निषेध करतो. त्यांनी संसदेत हिंदूंची माफी मागितली पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.