पुण्यातल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श ही कार चालवत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांनाही उडवलं. या दोघांचाही अपघातात मृत्यू झाला. ताशी १६० किमीच्या वेगात हा अल्पवयीन मुलगा पोर्श कार चालवत होता. १९ मेच्या पहाटे ही घटना घडली. या घटनेचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. या प्रकरणात सुरुवातीला मुलाला जामीन मिळाला होता. मात्र या घटनेबाबत रोष व्यक्त झाल्यानंतर या मुलाच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली. तसंच या मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यापैकी कुणालाही सोडणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुण्यात १९ मेच्या पहाटे मद्यधुंद अवस्थेत पोर्श ही कार चालवत एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बाईकवरुन घरी जाणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना उडवलं. या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र १५ तासांत त्याला जामीन मिळाला. १५ तासांत त्याला जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडिया आणि समाजात संताप व्यक्त झाला. १९ तारखेपासून या घटनेवर विविध पडसाद उमटत आहेत. समाजात हा विषय चर्चिला जातो आहे. अशात या मुलाच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे. तर मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात राजकीय आरोप होत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे