कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा आज गुरुवारी पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक संपन्न झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला गावच्या बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे या वारकरी दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत शासकीय महापूजेचा मान मिळाला.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागातून सुमारे चार ते पाच लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. पंढरी नगरी विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे.चंद्रभागा स्नानासाठी चंद्रभागेचा तीर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. दरम्यान यंदा राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आणि विविध समाजांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे काही प्रमाणात भाविकांची संख्या घटली आहे.
शासकीय महापूजेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर मानाच्या वारकऱ्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षभर एसटीचा मोफत पास देऊन सन्मान केला.
देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
- Advertisement -