Wednesday, February 28, 2024

मनोज जरांगेंच्या मागणीवर फडणवीसांची रोखठोक भूमिका,ते गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या गेल्या सहा महिन्यांपासून चालू असलेल्या आंदोलनाला यश आलं आहे. शुक्रवारी (२६ जानेवारी) मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं राजपत्र मनोज जरांगे यांच्या हाती सुपूर्द केलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशी (नवी मुंबई) येथे आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवलं. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे राज्य सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणीदेखील मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. ही मागणी राज्य सरकारने मागे घेतली आहे.

आंतरवाली सराटीसह राज्यभर विविध ठिकाणी मराठा आंदोलकांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते. ते गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असं जरांगे यांनी जाहीर केलं. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सविस्तर माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा आंदोलकांवर जिथे-जिथे गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतरवाली सराटी असो किंवा इतर ठिकाणचे गुन्हे निश्चितच मागे घेतले जातील. परंतु, घरं जाळल्याची प्रकरणं, पोलिसांवर थेट हल्ला, इतर वास्तूंची जाळपोळ करणे, बसेसची जाळपोळ करणे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांसंदर्भात आपल्याला (राज्य सरकार) निर्णय घेता येत नाही. न्यायालयाच्या आदेशाशिवाय आपण यामध्ये काहीच करू शकत नाही, आपण ते गुन्हे मागे घेऊ शकत नाही. त्यामुळे ते गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. इतर गुन्हे आपण मागे घेत आहोत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles