राज्यातील सत्तांतर आणि एकनाथ शिंदेंनी केलेली बंडखोरी अजूनही चर्चेत आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत फूट पडली. या बंडानंर मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर होती. तुम्ही मुख्यमंत्री बना असा फोन उद्धव ठाकरेंनी केला होता असा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केला.
तुम्ही त्यांना कशाला सोबत घेता किंवा एखादे पद देता त्यापेक्षा मीच सगळा पक्ष घेऊन येतो तुम्ही मुख्यमंत्री बना. सगळं नीट होईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. पण, मी त्यांना म्हणालो आता वेळ निघून गेली आहे. माझ्या पातळीवर हा विषय संपला आहे. हवं तर तुम्ही वरिष्ठांशी चर्चा करू शकता असे मी म्हणालो. पुढे त्यांनी आमच्या वरिष्ठांशी चर्चा केली की नाही याची कल्पना मला नाही. हा फोन मिलींद नार्वेकर यांनी लावून दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले असे फडणवीस या मुलाखतीत म्हणाले.