बाबरी मशिदीवरून फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य करत म्हणाले आहेत की, ते (उद्धव ठाकरे) काय म्हणाले परवा, म्हणाले बाबरी मशीद पडली तेव्हा कुठल्या बिळात होते. कोणीतरी प्रश्न केला, मशिदींवरील भोंगे काढायला यांना जमलं नाही आणि हे म्हणतात आम्ही बाबरी मशीद पाडली. तो बाबरी ढाचा.. मी त्याला मशीद मानत नाही. कोणी हिंदू मशीद पाडू शकत नाही. तो ढाचाच होता. अभिमानाने सांगतो तो ढाचा आम्हीच पाडला. माझा सवाल आहे, तो ढाचा पडला तेव्हा तुम्ही कुठे होता. मी अभिमानाने सांगतो तो ढाचा पाडला, तेव्हा मी त्याच ठिकाणी होतो. एवढेच नाही तर, त्याआधी कारसेवेमध्ये याच राम मंदिरा करता बदायूच्या तुरुंगात मी 18 दिवस घालवले.”






