Saturday, January 25, 2025

Video: मुहूर्त ठरला! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात, मजेशीर व्हिडीओ

झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ‘देवमाणूस २’ या मालिकेलाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. या मालिकेत डॉ. अजितकुमार चंद्रकांत देव म्हणजे देवीसिंगची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने उत्कृष्टरित्या साकारली होती. एका खेडे गावातल्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या डॉ. देवीसिंगची कथेने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं होतं. याच मालिकेतील किरण गायकवाड आता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अभिनेत्याने नुकतीच लग्नाची तारीख जाहीर केली आहे.

‘लागिरं झालं जी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला भैय्यासाहेब आणि ‘देवमाणूस’ मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेला देवीसिंग अर्थात किरण गायकवाडने काही दिवसांपूर्वी प्रेमाची कबुली दिली होती. २९ नोव्हेंबरला अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरबरोबर फोटो शेअर करत, “ही आहे माझी होणारी ‘होम मिनिस्टर’” असं जाहीर केलं होतं. किरण गायकवाडच्या या पोस्टमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. त्यानंतर अलीकडेच किरणने होणारी पत्नी वैष्णवीबरोबर पहिला रील व्हिडीओ शेअर केला; जो क्षणार्धात व्हायरल झाला. आता किरणने लग्नाच्या तारखेचा खुलासा केला आहे.

अवघ्या काही दिवसांनंतर किरण वैष्णवीशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणार आहे. वैष्णवीबरोबर मजेशीर व्हिडीओ शेअर करत किरणने लग्नाची तारीख सांगितली आहे. १४ डिसेंबरला दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. “१४ डिसेंबर ही तारीख नोंद करून ठेवा”, असं अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles