राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची, तर प्रदेश प्रवक्तेपदी, विधानपरिषदचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातील युवा चेहरे वेगवेगळ्या व्यासपीठांवर पक्षाचा आवाज ठामपणे मांडतील यात शंका नाही, अशी प्रतिक्रिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिली आहे.