Wednesday, April 30, 2025

मुंडेसाहेबांचं नाव जरी घेतलं तरी…गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी धनंजय मुंडे यांची भावूक पोस्ट

गोपीनाथ मुंडे… महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कायमचं घर करून असलेलं राजकारणी व्यक्तीमत्व… आज गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या व्यक्तीमत्वाचे पदर उलगडून दाखवले आहेत. तसंच गोपीनाथ मुंडे आपल्या कायम स्मरणात असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी समर्थकांना आवाहन केलं आहे. गोपीनाथ मुंडे यांची जयंती गावागावात साजरा करा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

धनंजय मुंडे यांची पोस्ट
स्व.मुंडे साहेब… हे नाव घेतलं की समोर येतो साहेबांचा चेहरा, तो चेहरा ज्याने आयुष्यभर शेतकरी-कष्टकऱ्यांची सेवा केली. दीन-दुबळ्यांचा ते आवाज बनले आणि पोचले घराघरात आणि मनामनात! त्याच साहेबांचा जनसेवेचा ध्यास मनात व कार्यात जोपासत आहे… अप्पा सदैव तुमच्या स्मरणात…

तुमचाच धनंजय

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles