प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. मुंडे सध्या अपघातानंतर घरी विश्रांती घेत आहेत. आज प्रजासत्ताक दिन आहे. हा दिवस नेमका का साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन साजरा करायला सुरुवात होण्यापूर्वी काय घडलं होतं, याची पार्श्वभूमी धनंजय मुंडे यांनी मुलीला समजावून सांगितली.
अपघातामुळे सध्या घरी विश्रांती घेत असताना माझी मुलगी आदीश्रीसोबत गप्पा मारायला वेळ मिळतो आहे.
प्रजासत्ताक दिनाबद्दलच्या तिच्या प्रश्नाचे समाधान केले.
राजकीय व सामाजिक कार्याच्या गडबडीतील आयुष्यात असे क्षण आनंद देऊन जातात. #RepublicDay pic.twitter.com/HYWu73xEQa— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 25, 2023