धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पुणे- बेंगळरू महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाट यासह राज्यभरात विविध ठिकाणी धनगर समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी (दि.20) चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा निर्धार चौंडी येथील उपोषणकर्ते तसेच धनगर समाजाच्या नेत्यांनी घेतला आहे. दरम्यान प्रकृती खालावल्याने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल आण्णासाहेेब रूपनवर यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुणे येथे हलवण्यात आले आहे. तर चोंडी यथील आणखी एक उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची प्रकृतीही खालावली आहे.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी या ठिकाणी मागील 15 दिवसांपासून यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, उपाध्यक्ष अण्णासाहेब रुपनवर, भाऊसाहेब दांडगे यांच्यासह सात जणांचे उपोषण करून आंदोलन सुरू आहे.
अहमदनगर जिल्ह्यात धनगर समाज आरक्षण…उपोषणकर्त्यांनी आजपासून पाणी सोडले …व्हिडिओ
- Advertisement -