Saturday, May 18, 2024

‘घड्याळाची’ उमेदवारी करणाऱ्या अर्चना पाटील म्हणतात, माझे पती भाजपचे आमदार, मी कशाला राष्ट्रवादी वाढवू…

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील येत असलेल्या बार्शी विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी व देवदर्शनासाठी गेलेल्या उमेदवार अर्चना पाटील यांना माध्यम प्रतिनिधीने, ‘बार्शीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा फारसा प्रभाव दिसत नसताना येथे पक्षाचे वर्चस्व कसे वाढवणार?’ अशी विचारणा केली असता, ‘मी कशाला वाढवू? मला तर काही कळतच नाही. मी महायुतीची उमेदवार आहे. मी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आणि एनडीए ४०० पार करण्यासाठी निवडणूक लढवत आहे’, हे वक्तव्य तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करून धाराशिवची उमेदवारी मिळवलेल्या अर्चना पाटील यांचे.

मुंबईत ४ एप्रिलला अर्चना पाटील यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्चना पाटील यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर रविवारी अर्चना पाटील बार्शीमध्ये आल्या असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली.

आमदार राजेंद्र राऊत यांच्याविषयी बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या, “राजेंद्र राऊत महायुतीचे घटक आहेत. माझे पती स्वत: भाजपचे आमदार आहेत. मला त्यांनी येथून तिकीट दिलं आहे. मी येथे भगवंताच्या दर्शनासाठी आले आहे. मी निवडून येणार आहे. राजेंद्र राऊत यांचा मला भावासारखा पाठिंबा आहे, असेही त्या म्हणाल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles