Saturday, May 18, 2024

उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल…आजारपणात तुम्ही माझी विचारपूस करत होता आणि तुमचे पाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस….

धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल परवा एक मुलाखत दिली. त्यामध्ये ते काहीतरी म्हणाले. यानंतर मला अनेकांनी मेसेज केले आणि विचारले मोदींना तुमचे प्रेम कसे आले. मीही त्यांना म्हटलं, मलाही त्यांच्याबद्दल प्रेम आहे. मात्र, मोदींचे प्रेम एवढे उतू गेले आहे की, ते म्हणाले, शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे. त्यांच्याबद्दल मला प्रेम, अस्था आहे. मग मी ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा ते माजी विचारपूस करायचे. मग हे जर खरे असेल तर तेव्हा ते तुमच्या खालच्या माणसांना माहिती नव्हतं का? एका बाजूला तुम्ही चौकशी करत होता, मग हे तुमचे पाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती नव्हत का?”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“माझ्या आजारपणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गद्दार हे रात्री गाठीभेटी करत होते. माझे सरकार कसे पाडायचे हे ठरवत होते. मग हे पंतप्रधान मोदी तुम्हाला माहिती नव्हतं का? आज तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे यांच्यावर कधी काही संकट आले तर मी धावून जाईल. पंतप्रधान मोदींवरही संकट आलं तर मीदेखील (उद्धव ठाकरे) धावून जाईल. फक्त तुम्ही महाराष्ट्र आणि देशावर संकट म्हणून आलात त्यावर आवर घाला. मग शिवसेना आणि भाजपाची युती तोडली तेव्हा तुम्हाला माहिती नव्हतं का? उद्धव ठाकरे कोण आहेत?”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles