मुंबई येथून बीडला डिझेल घेऊन निघालेला टँकर चालक मराठवाडी फाट्यावर टायर गार होण्यासाठी थांबुन चहा पिण्यासाठी गेला असता पाठीमागील टायर फुटून इलेक्ट्रिक शाॅट सर्किट होऊन डिझेलचा टॅकर पेटल्याची घटना १९ रोजी मध्यरात्री एकच्या दरम्यान नगर पाथर्डी रोडवरील मराठवाडी बसस्थानक येथे घडली.
मुंबई वरून बीडला २५,००० हजार लिटर डिझेल घेऊन निघालेला टँकर क्रमांक एम.एच 20,जी.सी. 0891 गरम झाल्याने टायर थंड होण्यासाठी आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथील बसस्थानक जवळ थांबवून चालक चहा पिण्यासाठी गेला असता अचानक पाठीमागील टायर फुटून ईलेक्ट्रीक शॉर्ट सर्कीट टॅकरला आग लागली.आत मध्ये झोपलेल्या सहकारी मित्राला खाली ओढत त्याचे प्राण वाचवले.ही घटना नगर पाथर्डी मार्गावरील आष्टी तालुक्यातील मराठवाडी बसस्थानक येथे १९ रोजी १ च्या दरम्यान घडली. चालक संतोष पोपट सोनवणे,(वय 38)रा. खंडाळा ता.वैजापूर,जिल्हा छञपती संभाजीनगर,सहकारी किरण प्रकाश आहेर हे दोघेही सुखरूप असुन टँकर डिझेल सह जळाले आहे.ही घटना समजाताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे,पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, पोलिस अंमलदार शिवदास केदार,चालक बाळासाहेब जगदाळे,रोकडे,शिरसाठ,यांनी घटनास्थळी धाव घेऊन अहमदनगर महानगर पालिकेचे तीन अग्निशमन बंब,नगरपरिषद पाथर्डी येथील एक अग्निशमन बंब,आष्टी आष्टी नगर पंचायतचा एक बंब अश्या पाच बंबाने मोठ्या अथक परिश्रमानंतर आग विझविण्यात यश आले.त्याच बरोबर परिस्थितीनुसार टप्प्याटप्याने वाहतुक खुली केली.पहाटे पाच वाजता आग पुर्ण विझविण्यात आली असून वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे.
डिझेलच्या टँकरने घेतला पेट….अहमदनगर पाथर्डी रोडवरील घटना.. व्हिडिओ
- Advertisement -