एका ‘डिजिटल भिकारी’चा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भिकारी हातात क्यूआर कोड घेऊन लोकांना भीक मागत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यामध्ये एक लहान मुलगी रस्त्यावर भीक मागत आहे. भीक मागत असताना अनेक जण आमच्याकडे सुट्टे पैसे नाहीत सांगतात. सुट्टे पैसे नाहीत म्हणून भीक देत नाहीत. त्यामुळे या मुलीने असं करणाऱ्या लोकांकडून पैसे मिळवण्यासाठी थेट क्यूआरकोड आणला आहे.
मुलीच्या हातातला क्यूआर कोड पाहून ही मुलं चकित होतात. @sutta_gram नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.