Tuesday, December 5, 2023

आंबेगावात अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे यांना धक्का, शिंदे गटाचे उमेदवार विजयी

राज्यातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. या ठिकाणी मतमोजणी सुरु झाली आहे. त्यात अनेक प्रस्थापितांना धक्के बसले आहेत. अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांना त्यांच्या गावात धक्का बसला आहे. या ठिकाणी शिंदे गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

राज्याचे सहकारमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्याच गावात धक्का दिला आहे. निरगुडसर गावात झालेल्या चुरशीच्या झालेल्या लढतीत शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. सरपंचपदासाठी शिंदे गटाचे रवी वळसे 135 मतांनी विजयी झाले आहे. पुणे जिल्हयात अनेक ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवार विजयी होत आहे. परंतु आंबेगावात त्यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला. निरगुडसर गावात शिंदे गटाचे सरपंच रवी वळसे पाटील विजयी झाले. या ठिकाणी एकूण 13 पैकीं 3 सदस्य शिंदे गटाचे तर 10 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय झाले. रवी वळसे यांना 1483 तर राष्ट्रवादीचे संतोष टाव्हारे यांना 1348 मते मिळाली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: