Tuesday, April 23, 2024

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; दोन शस्त्रक्रिया यशस्वी

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्यावर दोन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दिलीप वळसे पाटील आपल्याच घरामध्ये पाय घसरून पडले होते. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीटर अकाउंटवरून माहिती देखील दिली होती. “राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल.”, असं ट्वीट त्यांनी केलं होतं.त्यानंतर पुण्यातील जुपिटर हॉस्पिटलमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. घरात पाय घसरुन पडल्याने हात पाय आणि खुब्याला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्यांना यातून बरं होण्यासाठी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.

डॉक्टरांच्या सल्ल्याने वळसेपाटीलांच्या हात आणि पायावर शस्त्रक्रिया केली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी रात्री शरद पवारांनी वळसेपाटलांशी फोनवरुन संवाद साधला होता. तसेच वळसेपाटलांवर शस्त्रक्रिया सुरू असताना सुप्रिया सुळे हॉस्पिटलमध्ये उपस्थित होत्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles