अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी यांची नियुक्ती

0
98

अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी दिनेश लोखंडे यांची नियुक्ती

अहिल्यानगर : अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी दिनेश लोखंडे यांची नियुक्ती झाली असून त्याला आरबीआयने देखील मान्यता दिले आहे. दिनेश लोखंडे हे बँकेच्या क्लर्क या पदावर सेवेत रुजू झाले आहे, त्यांच्या प्रामाणिक कामामुळे तसेच बँकेबद्दल असलेले प्रेम पाहता ते आज बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करत आहे. त्यांच्या अनुभवाचा नक्कीच बँकेला फायदा होईल. अहमदनगर शहर सहकारी बँक ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध सुविधा पूर्वत आहे. दिनेश लोखंडे यांच्या पुढील कार्यास बँकेच्या वतीने शुभेच्छा देत असल्याचे प्रतिपादन चेअरमन सी.ए गिरीश घैसास यांनी केले.
अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी दिनेश लोखंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल बँकेच्या वतीने सत्कार करताना चेअरमन गिरीश घैसास,ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेचा, अशोक कानडे, संजय घुले, डॉ.विजयकुमार भंडारी, जयंत येलुलकर, डॉ.भुषण अनभुले, दत्तात्रय रासकोंडा, सेवक प्रतिनिधी. संतोष मखरे, वरिष्ठ अधिकारी प्रकाश वैरागर, संजय मुळे आदी उपस्थित होते.
दिनेश लोखंडे म्हणले की मी 1997 साली अहमदनगर शहर सहकारी बँकेमध्ये क्लर्क या पदावर नोकरीला लागलो आहे. त्यानंतर 2012 साली जुनिअर ऑफिसर 2020 साली सीनियर ऑफिसर आणि आता बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर संचालक मंडळांनी संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहत बँकेला पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल बँकेत मी गेली 28 वर्ष प्रामाणिकपणे आणि सोचोटीने काम केले असल्यामुळेच बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले.