‘लक्ष्यवेध मल्टीस्टेट’ चे दि. १ सप्टेबरला स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतर
४ थ्या वर्धापन दिनी अकोळनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन
अहमदनगर – नगर व पुणे जिल्ह्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागात विविध गावांमध्ये अल्पावधीत ठेवीदार, कर्जदारांचा विश्वास संपादन केलेल्या व तत्पर सेवेमुळे वेगाने वाटचाल करणाऱ्या लक्ष्यवेध मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटीच्या स्थापनेला दि. १ सप्टेबर रोजी ४ वर्ष पूर्ण होत आहेत. या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत संस्थेचे मुख्य कार्यालय अकोळनेर (ता.नगर) येथे उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा स्व मालकीच्या इमारतीमध्ये स्थलांतरीत होत आहे.
संतकवी दासगणू महाराज यांचे जन्मगाव असलेल्या नगर तालुक्यातील अकोळनेर येथे ४ वर्षापूर्वी ‘लक्ष्यवेध मल्टीस्टेट’ ची पहिली शाखा सुरु करण्यात आली होती. तेथूनच संस्थेची वाटचाल सुरु झाली आणि आज संस्थेच्या नगर आणि पुणे जिल्ह्यात २४ शाखा उत्तम प्रकारे कार्यरत आहेत. या शाखांमधून तत्पर वित्तीय सेवा दिल्या जात आहेत. यामध्ये बचत खाते, दैनंदिन ठेव, मुदत ठेव अशा प्रकारच्या ठेवींवर आकर्षक व्याजदर दिला जात आहे. या शिवाय माफक व्याजदरात सोनेतारण कर्ज, व्यक्तिगत कर्ज, तारण कर्ज दिले जात आहे. चांगल्या प्रकारे आणि तत्पर सेवा मिळत असल्याने संस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून त्यामुळेच संस्थेचे २ लाख पेक्षा जास्त सभासद झाले आहेत.
संस्थेने अल्पावधीत अकोळनेर गावात दुमजली कार्यालयीन इमारत उभारली असून या इमारतीत संस्थेच्या ४ थ्या वर्धापन दिनी दि. १ सप्टेबर रोजी अकोळनेर शाखेचे तसेच संस्थेच्या मुख्य कार्यालयाचेही स्थलांतर होणार आहे. या ठिकाणी संस्थेच्या वतीने ग्राहकांना लॉकर सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या कार्यक्रमास सर्व सभासद व संस्थेच्या ग्राहकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक मंडळ व कर्मचारी वृंदाने केले आहे.
‘लक्ष्यवेध मल्टीस्टेट’ चे दि. १ सप्टेबरला स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतर
- Advertisement -