साखर कामगारांच्या मागण्यांबाबत अखेर त्रिपक्ष समिती गठित !
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा साखर कामगारांचा मोर्चा स्थगित
अहिल्यानगरः महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यातील व जोडधंद्यातील कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांबाबत विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने शासन निर्णय क्र. ससाका-२०२४/प्र.क्र.४९ कामगार-३, दि.११/१२/२०२४ अन्वये साखर कारखाना मालक प्रतिनिधी आणि साखर कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधी अशी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
साखर कामगारांच्या वेतनवाढीच्या मागील कराराची मुदत दि.३१/०३/२०२४ रोजी संपलेली होती. याबाबत महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ या दोन राज्यव्यापी संघटनांनी दि. ०७/०८/२०२४ रोजी मा. साखर आयुक्त, पुणे यांचे कार्यालयावर सुमारे ५० हजार साखर कामगारांचा इशारा मोर्चा काढण्यात आला होता. परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही म्हणुन वरील दोन्ही राज्यव्यापी संघटनांनी दि. २८/११/२०२४ रोजी महाराष्ट्र शासन व संबंधितांना संपाच्या नोटीसा पाठविल्या होत्या. तसेच दि. ०३/१२/२०२४ रोजीपासुन महाराष्ट्रातील सर्व सहकारी, खाजगी व भाडेपट्ट्याने चालविण्यास दिलेल्या कारखान्यांवर गेट सभा घेऊन दि. १६/१२/२०२४ रोजीचा बेमुदत संप यशस्वी करण्यासाठी राज्य दौरे केले होते. त्याचा परिपाक म्हणुन राज्यातील साखर व जोडधंद्यातील कामगार उत्सफुतपणे संपाची तयारी केलेली होती. याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. दि. ०८/१२/२०२४ रोजी मा. ना. श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे उपस्थितीत साखर संघ व अधिकाऱ्यांची बैठक होऊन त्रिपक्षीय समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.
महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ या दोन राज्यव्यापी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मंगळवार दि. १०/१२/२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता मा. ना. श्री. अजित पवार यांचे दालनामध्ये त्रिपक्षीय समितीबाबत साखर कामगारांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झालेनंतर दि. ११/१२/२०२४ रोजी सोबत दिलेला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्या. यांचे अध्यक्ष श्री. पी. आर. पाटील यांनी आजरोजीच कामगार संघटनांना महाराष्ट्रातील साखर व जोडधंद्यातील कामगारांचा निर्णय न झालेमुळे साखर कारखान्यातील कामगार दि. १६/१२/२०२४ रोजीपासुन बेमुदत काम बंद संप स्थगित करण्यात यावा अशी विनंती केल्यानंतरच राज्यातील महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ या दोन्ही राज्यव्यापी संघटनांनी दि. १६/१२/२०२४ रोजीपासुन पुकारलेलाबेमुदत संप महासंघाचे सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर, अध्यक्ष कॉ. पी. के. मुडे, कार्याध्यक्ष श्री. शिवाजी औटी, प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष श्री. तात्यासाहेब काळे, सरचिटणीस श्री. शंकरराव भोसले, कार्याध्यक्ष राऊ पाटील, अविनाश आपटे यांनी आजरोजी मागे घेण्यात आल्याचे सांगितले.
या त्रिपक्षीय समितीमध्ये अहमदनगर जिल्हयातील महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर, कार्याध्यक्ष श्री. शिवाजी औटी, श्री. दत्तात्रय मिठु निमसे आणि श्री. अविनाश आपटे यांची निवड झालेली आहे.