राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने राज्यातील 1 हजार 21 महसुली मंडळामध्ये अनेक सवलती जाहिर केल्या असुन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती घेण्याचाही निर्णय घेतला आहे.
याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वसुलीस स्थगिती दिली असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले व उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी दिली. या शासन निर्णयाबाबत बँकेच्या एक्झिक्युटिव्ह कमिटी सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
बँकेचे शेती निगडित कर्ज 4 हजार 614 कोटीचे वसुलास पात्र असुन त्यापैकी 125 कोटी रकमेची वसुली आली आहे. ज्या कर्जदार शेतकर्यांना स्वतःहून कर्ज वसुली द्यावयाची असल्यास अशा कर्जदारांसाठी बँकेकडून वसुली स्विकारली जाईल. विहित मुदतीत कर्ज भरणार्या सभासदांना शासनाच्या शुन्य टक्के व्याजदर सवलतीचा लाभ होईल. तसेच पुढील पिक कर्ज वितरणही होईल. अशी माहिती अध्यक्ष कर्डिले यांनी दिली.