शिर्डी – ते – मुंबई व व्हाया अहिल्यानगर, पुणे या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची जिल्हा भाजपची मागणी.
आज शुक्रवार दिनांक 4 /10/ 2024 रोजी शिर्डी येथे रेल्वेमंत्री ना. आश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने त्यांच्याकडे “शिर्डी – ते – मुंबई, व्हाया अहिल्यानगर, पुणे या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची जिल्हा भाजपची मागणी केली ” शिर्डी हे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त तीर्थक्षेत्र आहे. देश-विदेशातून अनेक भाविक शिर्डीला येत असतात. दक्षिण भारतातून येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेची अत्यंत चांगली सुविधा आहे. मात्र मुंबई ते शिर्डी व्हाया पुणे मार्गे रेल्वेची अशी कोणतीही सुविधा नसल्यामुळे भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, नगर महानगराचे सरचिटणीस श्री सचिन पारखी, शिर्डी शहर भाजपचे अध्यक्ष श्री सचिन शिंदे, माजी नगरसेवक गजानन शेरवेकर, शिर्डी शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष चेतन कोते, श्री गणेश जाधव आदी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मागणी केली. व त्यांनीही या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले.