अहिल्यानगर : राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच मैनाबापू रावसाहेब शेंडगे यांनी शासकीय मिळकतीमध्ये अतिक्रमण केल्यामुळे त्यांना अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले आहेत.
घोरपडवाडी ग्रामपंचायतीमध्ये २०२३ साली लोकनियुक्त सरपंच म्हणून मैनाबापू रावसाहेब शेंडगे यांची निवड झाली होती. माजी सरपंच सयाजी कारभारी श्रीराम यांनी मैनाबापू शेंडगे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असून याची नोंद त्यांचे वडील रावसाहेब शेंडगे यांच्या नावावर असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या प्रकरणाची चौकशी होऊन रावसाहेब शेंडगे यांनी अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सरपंच शेंडगे यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले.
अर्जदार सयाजी कारभारी श्रीराम यांच्या वतीने ॲड. गोरक्ष पालवे यांनी युक्तिवाद केला. अॅड. गुरविंदर पंजाबी, रोहित बुधवंत, सागर गरजे, प्रवीण निंबाळकर, विवेक बडे, धनश्री खेतमाळीस, विशाल वांढेकर, राहुल दहिफळे, पुष्कराज बिडवाई, तेजस राख, अपेक्षा बोरुडे, बाळकृष्ण गीते यांनी साहाय्य
केले.