ज्या विद्यार्थ्यांचे एल.एल.बीचे शिक्षण पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायाधीश पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर लगेचच अर्ज दाखल करावा.
राजस्थान उच्च न्यायालयाने ९ जुलै रोजी याबाबत अधिसूचना जाहिर केली होती. या रिक्त पदांसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला राजस्थान उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
या भरतीसाठी एकूण ९५ पदे भरण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट २०२४ आहे. तर अर्जाचे शुल्क भरण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२४ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला hcraj.nic.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागेल. याबाबत अधिक माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.या नोकरीची निवड लेखी परिक्षेद्वारे होणार आहे. ही लेखी परीक्षा कधी घेण्यात येणार आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.ही परीक्षा जोधपूर आणि जयपूरमध्ये घेतली जाईल.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय उमेदवाराकडे ७ वर्ष कामाचा अनुभव असावा. या पदासाठी ३५ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्जाची फी भरावी लागेल. या पदासाठी निवड झाल्यास दर महिना १४४८४० ते १९४६६० रुपये पगार दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही https://hcraj.nic.in/hcraj/hcraj_admin/uploadfile/recruitment/Binder1172050260026.pdf या लिंकवर क्लिक करा.