घटस्फोटीत प्राथमिक शिक्षक, शिक्षिकांची सेवा पुस्तकात नोंद व्हावी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी
कागदोपत्री घटस्फोट घेऊन शिक्षक बदली व इतर लाभ घेत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- घटस्फोटीत नसताना देखील घटस्फोटीत दाखवून लाभ घेणाऱ्या शिक्षकांचा भंडाफोड होण्यासाठी घटस्फोटीत प्राथमिक शिक्षक, शिक्षिकांची सेवा पुस्तकात नोंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने करण्यात आली आहे. रिपाईचे ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी संदीप वाघचौरे, दानिश शेख, संतोष पाडळे, विकास पटेकर, विशाल भिंगारदिवे, अजय बडोदे आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शिक्षक-शिक्षिका यांचे फक्त कागदोपत्री घटस्फोट झालेले आहेत. ते शिक्षक बदली व इतर लाभ घेतात. तसेच काही जण बदली करिता त्याचा वापर करताना दिसतात. अन्य काही मात्र आताच लाभ घेत नाही, अशा कार्यरत घटस्फोटीत सर्व प्राथमिक शिक्षकांची त्यांच्या सेवा पुस्तकातून घटस्फोटची नोंद घेतल्यास खरे व खोटे उघड होण्यास सोपे जाणार आहे. ज्यांनी घटस्फोटातून लाभाकरिता अर्ज भरलेला आहे, त्यांची नावे देखील शिक्षण विभागाने जाहीर करावी. त्यामुळे होणारी फसवणुक टाळता येणार असल्याचे रिपाईच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यातील शासनाची फसवणूक! करणाऱ्या घटस्फोटीत प्राथमिक शिक्षक, शिक्षिकांची….
- Advertisement -