नगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांच्या विविध मागण्या मंजूर करून घेण्यासाठी महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव संभाजीनगर (औरंगाबाद) येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाने धडकणार आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि.9 ऑगस्ट) वीराट आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रहार दिव्यांग क्रांतीचे प्रसिद्ध प्रमुख पोपटराव शेळके यांनी दिली. या मोर्चात जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे यांनी केले आहे.
दिव्यांगांना दरमहा 6 हजार रुपये मानधन मिळावे, सरसकट दिव्यांगाना घरकुल, दिव्यांगांचे नोकर भरती, राजकीय आरक्षण, व्यवसायासाठी जागा, अपंग वित्त महामंडळ व बीज भांडवल आणि कर्जमाफी मिळावी आदी मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने दिव्यांग बांधव या मोर्चात सहभागी होण्यासाठी संघटनेच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी पांडुरंग कासार, हमीद शेख, किशोर सूर्यवंशी, संदेश रपारिया, राजेंद्र पोकळे, मधुकर घाडगे, सलीम शेख, लक्ष्मीबाई देशमुख, लक्ष्मण अभंग आदी प्रयत्नशील आहेत.
एक लाख दिव्यांगांचे वादळ ऑगस्ट क्रांती दिनी संभाजीनगरला धडकणार..
- Advertisement -