देशभरात दिवाळीनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. देशभरातील लोकांनी दिवाळीनिमित्त जय्यत तयारी केलेली दिसत आहे. या दिवाळी सणासाठी भारतातील सर्वच कर्मचाऱ्यांचं कंपनीच्या दिवाळी बोनसकडे लक्ष असतं. काही कंपनीतील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळाला आहे. तर काही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना फक्त सोनपापडी, काजू बर्फी सारखे गोड पदार्थ मिळाले आहेत. बोनसवरून सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. या दिवाळीत बोनसवरून तरुणांचं भन्नाट गाणं व्हायरल झालं आहे.
दिवाळीत अनेकांची नव्या वस्तू, कपडे आणि फराळ बनविण्याची लगबग असते. या दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे. या सणासाठी घरातील कमवत्या व्यक्तीचा खर्चही अधिक वाढतो. त्यामुळे दिवाळीचा बोनस मिळाला पाहिजे, असं मागणी करणारं भन्नाट गाणं तरुणांनी तयार केलं आहे. तरुणांचं हे गाणं प्रचंड व्हायरल झालं आहे.
बायकोला खरेदीची घाई, दिवाळीचा बोनस मिळाला पाहिजे; तरुणांचं भन्नाट गाणं व्हायरल
- Advertisement -