संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी द्रविड मुन्नेत्र कळघम ( डीमके ) खासदार डी.एनव्ही सेंथिलकुमार एस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन विधेयकांवरील चर्चेत सेंथिलकुमार एस यांनी भाग घेतला. तेव्हा बोलताना सेंथिलकुमार एस म्हणाले, “देशातील जनतेनं विचार केला पाहिजे की, भाजपाची ताकद फक्त हिंदी पट्ट्यातील राज्ये जिंकण्यापुरतीच आहे. ज्याला आम्ही गोमुत्र राज्ये म्हणून संबोधतो. तुम्ही ( भाजपा ) दक्षिण भारतात येऊ शकत नाही. तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकात काय झालं, हे सर्वांनी पाहिलंच आहे. आम्ही तिथे खूप मजबूत आहोत.”