सोशल मीडियावर अनेक वेळा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टरांचा एक गृप डान्सद्वारे लोकांना हात धुण्याचे आवाहन करत आहे. डॉक्टरांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हात न चुकता धुवावेत हे आपण गेल्या अनेक वर्षांपासून ऐकत आहोत. कोरोना काळात हाताच्या स्वच्छतेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. हाताची स्वच्छता विविध विषाणूजन्य संसर्ग टाळण्यास मदत करू शकते. हात धुणे ही काळाची गरज आहे. हाताच्या स्वच्छतेचे पालन केल्याने स्वतःला आजारापासून दूर ठेवता येऊ शकते.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की डॉक्टरांचा एक गृप लोकांना सात सोप्या पद्धतीने हात धुण्यास सांगत आहे. यासाठी डॉक्टरांनी डान्स स्टेप्सही केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ७ डॉक्टर एक एक करत येत हात धुण्याच्या स्टेप दाखवत आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूपच मजेदार वाटत आहे. हा व्हिडिओ @adida_boys नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आतापर्यंत २४ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.