Tuesday, June 25, 2024

Ahmednagar crime : दवाखान्यात घुसून डॉक्टरसह कुटुंबियांना बेदम मारहाण

नगर – सावेडी उपनगरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये घुसून इलेट्रिक साहित्य, बेड व इतर वस्तू बाहेर फेकत ऑपरेशन थिएटर मधील मशिनरींची तोडफोड केली. तसेच हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या डॉटरच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना टोळयाने मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.९) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत डॉ. अनिल सूर्यभान आठरे (वय ७३, रा. आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्यावर, झोपडी कॅऩ्टीन समोर, सावेडी) यांनी रात्री उशिरा तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झोपडी कॅऩ्टीन समोर असलेल्या त्यांच्या आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रविवारी (दि.९) सायंकाळी ६.३० च्या सुमारास आरोपी गणेश सर्जेराव फसले (रा. ओम रेसिडेन्सी, तपोवन रोड), घंट्या उर्फ गणेश घोरपडे व त्यांच्या समवेत काही अनोळखी इसम आले. त्यांनी जोरजोरात शिवीगाळ करत हॉस्पिटलमधील बेड, इलेट्रिक साहित्य व इतर वस्तू बाहेर फेकत नुकसान केले. त्यानंतर ऑपरेशन थिएटरमधील मशिनरींची तोडफोड केली. तसेच हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या डॉ. आठरे यांच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या पत्नी आणि मुलीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ५० लोक घेवून येवू आणि तुम्हाला उध्वस्त करू अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी या टोळया विरुद्ध भा. दं. वि. कलम ३५४, ४२७, ४४८, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles