कुत्रा हा एक इमानी प्राणी आहे. अनेक व्यक्ती आपल्या घरी कुत्रा पाळतात, त्यांना जीव लावतात. जी व्यक्ती कुत्र्यावर माया करते त्याला जीव लावते अशा व्यक्तींशी श्वान नेहमीच इमानी राहतात. अनेक व्यक्ती आपल्या पाळीव कुत्र्यांना आपल्यासारखे लाईफस्टाइल जगू देतात. अशात सध्या सोशल मीडियावर एका कुत्र्याचा वाहन चालवतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक कुत्रा आपल्या कारमध्ये बसून आरामात कार चालवत आहे. कार चालवताना जनू काही या कुत्र्याला एकदम परफेक्ट ड्रायवींग येतेय असे भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. कारमध्ये फक्त कुत्रा आणि त्याच्या शेजारी एक मुलगा बसलेला आहे. या दोघांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
कारच्या स्टेअरींगवर कुत्र्याने हात ठेवलाय आणि तो कार चालवतोय. इतकचं नाही तर हा कुत्रा वाहतूक कोंडीमधून कार चावत आहे. वाहतूक कोंडी फोडून वाट काढत आहे
अरेच्चा! कुत्र्याने चक्क कार चालवली; ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडीओ
- Advertisement -