Sunday, February 9, 2025

सरकारला विनंती करू… लाडकी बहीण, लाडका भाऊनंतर लग्नाळू लोकांची अजब मागणी व्हिडिओ

राज्यातील महिलांची आर्थिक अडचण दूर करताना नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. राज्यभरातून या योजनेला तुफान प्रतिसाद मिळाला. लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर टीका करताना राज्यातील भावांनी काय गुन्हा केलाय? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. त्यामुळे लाडका भाऊ योजनाही अंमलात आणली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात जाहीर केलं. बेरोजगार तरुणांसाठीही सरकारने युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित केली आहे. याच योजनेला माझा लाडका भाऊ योजना असं संबोधलं जात आहे. दरम्यान लाडकी बहीण आणि लाडका भाऊ नंतर आता काही लग्नाळू लोकांनी सरकारकडे नवी मागणी केली आहे. एका तरुणाने हातात पोस्टर घेऊन सरकारकडे अजब मागणी केली आहे. तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अनेक तरुणांचे वय उलटत चालले तरी लग्न जुळत नसल्याने अनेकजण चिंतेत आहे. मुलांच्या किंवा मुलींच्या अपेक्षा जुळणे, शिक्षण-नोकरी, घरची परिस्थिती आणि वैचारिक मतभेद अशा अनेक कारणांमुळे अनेकांची लग्न रखडली आहेत. दरम्यान कित्येक तरुणांना चांगली नोकरी नाही किंवा मुलगी नोकरी करत नाही म्हणून लग्न मोडल्याचे किंवा जुळत नाही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थिती या लग्नाळू लोकांनी आता सरकारकडे मदतीची धाव घेतली आहे. इंस्टाग्रामवर yeda_dipuuu नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles