तुम्ही डबल डेकर बस पाहिली असेल मात्र कधी डबल डेकर सायकल पाहिलीय का? सध्या एका डबल डेकर सायकलचा व्हिडीओ व्हायरल होतोय. जो पाहून तुम्हीही चकित व्हाल.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती रस्त्यानं सायकल चालवतोय. मात्र ही सायकल इतर सायकलपेक्षा वेगळी आहे. व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती डबल डेकर सायकल चालवताना दिसत आहे. सामान्य सायकलपेक्षा उंच असूनही ही व्यक्ती सहजतेनं सायकल चालवताना दिसतेय. रस्त्यावरुन जाणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीनं हा व्हिडीओ शूट केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.