Thursday, September 19, 2024

झेड प्लस सुरक्षेबाबत संशय ….शरद पवार दिल्लीला रवाना

दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. उद्या (शुक्रवारी) शरद पवारांच्या सुरक्षेबाबत दिल्लीमध्ये रिव्ह्यू मीटिंग पार पडणार आहे. गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांची भेट घेऊन सुरक्षेबाबत चर्चा करणार आहेत. अद्याप शरद पवारांनी केंद्रानी दिलेली सुरक्षा घेतलेली नाही, दिल्लीला रवाना होण्यापूर्वी देखील शरद पवारांना महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. केंद्राच्या सुरक्षेवरून शरद पवारांनी कदाचित केंद्राला अचूक माहिती घ्यायची असेल अशी संशय निर्माण करणारे वक्तव्य केले होते.

शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता उद्या होणारी बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. गृह खात्याकडून अमित शाह, मोहन भागवत आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना विशेष सुरक्षा देण्यात येणार असल्याची माहिती आहे. नुकतीच मोहन भागवत यांना सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. दरम्यान दिल्लीत होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

केंद्रीय एजन्सींनी संभाव्य धोक्यांचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना उच्चस्तरीय सशस्त्र व्हीआयपी सुरक्षा देण्याची शिफारस केली. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना झेड प्लस सुरक्षा देऊ केली आहे. दरम्यान, शरद पवारांनी मात्र, त्यांना देऊ केलेल्या Z+ सुरक्षेवरुन संशय व्यक्त केला आहे. मला दिलेली सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

“काल माझ्याकडे केंद्रातील गृहखात्याचे एक अधिकारी आले. कदाचित निवडणुका आहेत. निवडणुकांसाठी मी सगळीकडे फिरणार, त्यामुळे निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्यासाठी ही व्यवस्था असू शकते, बाकी मला काही माहिती नाही.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles