| अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फुट पडली. पुढील वर्षात अर्थात 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कधीही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मोठी खेळी केली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी माझी नियुक्ती करण्यात आली. माझ्यावर हा विश्वास दाखवत ही जबाबदारी दिल्याबद्दल आदरणीय शरद पवार साहेब, महासंसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे… https://t.co/C0uCtZQmBg
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 11, 2023