नवीन विहिरीसाठी अडीच लाखांचे अनुदान….शेतकऱ्यांच्या फायद्याची सरकारी योजना

0
66

अनुसूचित जाती , नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वती उपलब्ध करून देण्यासाच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते.
लाभार्थी हे अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे.

शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असावे.

विहिरीचा लाभ घ्यायचा असल्यास ०.४० हेक्टर शेतजमीन असायला हवी.

नवीन विहीर व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घेण्यासाठी ०.२० हेक्टर शेतजमीन हवी.

लाभार्थीकडे कमाल क्षेत्र ६ हेक्टरपेक्षा जास्त नसावे.

शेतकऱ्याच्या नावे सात-बारा, ८-अ उतारा आवश्यक

बॅंक खाते आधार कार्डशी लिंक असावे.

नवबौद्ध शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न दीड लाखापेक्षा अधिक नसावे.

मागील वर्षाचा उत्पन्नाचा दाखला

ग्रामसभेची शिफारस आवश्यक

नवीन विहीर घेणे २ लाख ५० हजार

जुनी विहीर दुरुस्ती ५० हजार

इनवेल बोअरिंग २० हजार

वीजजोडणी १० हजार

शेततळ्यांचे प्लास्टिक १ लाख

सूक्ष्म सिंचन संच ५० हजार, तुषारसाठी २५ हजार

पेप संच २० हजार

नवीन विहीर पॅकेज ३ ते ३.३० लाख

जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज १ ते दीड लाख

शेततळे अस्तरीकरण पॅकेज १.५५ ते १.८० लाख

सोलरपंप अनुदान ३० हजार

संपर्क – कृषी विभाग, जिल्हा परिषद