बऱ्याच लोकांना सवय असते की अर्धवट कापलेला कांदा फ्रिजमध्ये बाहेर पडतो, त्याचे विषारी गॅसमध्ये रूपांतरित होते. त्यामुळे जर तुम्ही कांदा कापला तर लगेच संपून टाका पण फ्रिजमध्ये ठेवू नका म्हणजे इतर गोष्टींना त्याचा वास येणार नाही.
बऱ्याच लोकांना सवय असते की मळलेली कणीक फ्रिजमध्ये ठेवतात आणि दोन तीन दिवस ती कणीक वापरायची पण अशाने तुम्ही शिळं अन्न खाऊन तुमच्या शरीरामध्ये चुकीची संप्रेरके तयार होतात. चुकीचे पाचक स्त्राव तयार होतात. कणीक भिजवून फ्रिजमध्ये कधीही ठेऊ नये.
आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. अख्ख आलं की लसूण कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण आलं जर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवले तर त्याला बुरशी येते कारण फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ ओले होतात, दमट होतात. त्यामुळे त्याच्यावर बुरशी येते आणि त्याचे सेवन केल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो.
आलं लसूण, कांदा, मळलेली कणीक या गोष्टी अजिबात फ्रिजमध्ये ठेवू नका. आणि फ्रिजमध्ये काहीही ठेवले तरी त्याच्यावर झाकण ठेवायला विसरू नका.
healyourselfwith_manasikrishna या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फ्रिज मधे या गोष्टी का ठेवू नये ?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.