आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांचीदेखील बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. भोसले पूर्वी अहमदनगरला जिल्हाधिकारी होते.