Monday, December 9, 2024

केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्वाधिक योजना आणि निधी आणणारा एकमेव खा.डॉ.सुजय विखे पाटील

अहमदनगर – केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्वाधिक योजना आपल्या मतदारसंघात आणण्यात अहमदनगरचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा राज्यात पहिला नंबर लागत असून असा कर्तव्यदक्ष खासदार या मतदार संघात लाभला हे या मतदार संघाचे भाग्य असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आ.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

भाजपच्या महाविजय २०२४ लोकसभा प्रवास या घर चलो अभियान प्रसंगी ते बोलत होते. अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर ही यात्रा आली असता सुप्पा येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.यावेळी खा.डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, प्रदेश महामंत्री श्री विजय चौधरी तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना ते म्हणाले की अहमदनगर जिल्हयात मागील चार वर्षात केंद्र सरकारच्या तसेच मागील एक वर्षात राज्य सरकारच्या लोक कल्याणकारी योजना अत्यंत प्रभावीपणे राबविल्या आहेत. त्यांच्या याच कामाचा धडक्यामुळे ते लोकसभेत पहिल्या दहा सर्वोत्तम खासदारांत त्यांची नोंद करण्यात आली. त्यांच्या या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले असून आपण त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून पाठवावे असे आवाहन केले.

आपला भारत देश आता महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वाचे नेते झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांना देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान करावयाचे आहे. आपण सर्वांनी एक निर्धाराने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करून लोकसभेत डॉ.सुजय विखे आणि देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करावयाचे आहे असे याप्रसंगी त्यांनी आवाहन केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सुप्पा या ग्रामपंचायती सह पंचक्रोशीतील गावाची माती, माझी माती माझा देश या उपक्रमा अंतर्गत आणलेल्या कलशात जमा केली.
यावेळी सुप्पा ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles