नगर तालुक्यातील गुणवडी परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस ड्रोन नागरिकांच्या वस्त्यांवरती घिरट्या घालत आहे. रात्रीच्या अंधारात ड्रोन का व कशामुळे घिरट्या घालते असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. परिसरात रात्रीच्या वेळी अचानकपणे ड्रोन घिरट्या घालताना निदर्शनात आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
पाथर्डी, शेवगाव या तालुक्यातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी नागरी वस्त्यांवर ड्रोन घिरट्या घालत असल्याच्या घटना घडल्या आहेत. आता हे लोन नगर तालुक्यातही परसले आहे. तालुक्यातील गुणवडी परिसरात २ दिवसांपूर्वी रात्री आठ वाजता अचानकपणे अंधारात नागरी वस्त्यांवर ड्रोन घिरट्या घालताना नागरिकांच्या निदर्शनात आले. सुमारे चार ते पाच तासांपर्यंत रात्रीच्या वेळी गुणवडी ते मांडवगण रस्त्यावरील वस्त्या आणि गुणवडी ते रुई छत्तीशी रस्त्यावरील वस्त्यांवर ड्रोनच्या घिरट्या सुरूच होत्या. सुरुवातीला नागरिकांनी ड्रोन कडे दुर्लक्ष केले. परंतु चार पाच तासापर्यंत ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.
रात्रीचे ड्रोन कोण उडवतय अन् ऑपरेट कोण करतय याचा शोध तरुणांनी घेतला. परंतु कोणीच सापडले नाही. ड्रोन आले कुठून अन् ऑपरेट करतय कोण ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
रात्रीच्या वेळी नागरी वस्त्यांवर घिरट्या घालणारे ड्रोन दोनशे ते तीनशे फुट उंचीवर असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. रात्रीच्या वेळी कोण व कशासाठी नागरी वस्त्यांवर ड्रोन उडवित असेल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
रात्री आठ वाजता व साडेनऊ वाजता गुणवडी ते मांडवगण रोड व रुईछत्तीशी रस्त्यावरील वस्त्यांवरील घरांवर अचानकपणे ड्रोन फिरु लागले. ड्रोन कोण उडवतय याचा नागरिकांनी शोध घेतला पण कोणीच दिसुन आले नाही. ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.- महेंद्र शेळके, मा. उपसरपंच गुणवडी