Tuesday, February 18, 2025

Video: मद्यधुंद शिक्षकाचा शाळेत धिंगाणा, विद्यार्थ्यांनी ‘असा’ काढला राग

एका प्राथमिक शाळेत घडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्राप्त माहितीनुसार, छत्तीसगडमधील बस्तर येथील सरकारी शाळेत एक शिक्षक चक्क दारूच्या नशेत डुलत डुलत शाळेत पोहोचला होता. मग काय, एरवी चांगलं वाईट शिकवणाऱ्या शिक्षकाची ही अवस्था बघून विद्यार्थी इतके चिडले होते की त्यांनी त्या शिक्षकालाच आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवला.

आपण व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, प्राथमिक शाळेतील विद्यार्थी दुचाकीवरून एका व्यक्तीचा पाठलाग करताना दिसत आहेत. स्नेहा मोरदानी नावाच्या सोशल मीडिया युजरने X वर हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “बस्तरमध्ये, एक शिक्षक मद्यधुंद अवस्थेत शाळेत आला होता तेव्हा मुलांनी त्याला धडा शिकवण्याची जबाबदारी आपल्या हाती घेतली. या शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्गात शिवीगाळ केला होता ज्याला कंटाळून मुलांनी पाठलाग करत त्याला शूज आणि चप्पल फेकून मारले. यानंतर शिक्षक पळून गेला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles