प्रभाग ४ मध्ये ४००० घरांना डस्टबिन वितरण, परंतु महापालिकेच्या अपुऱ्या सुविधांमुळे शहरात अस्वच्छता- नगरसेवक योगीराज गाडे
प्रभाग क्रमांक ४ मध्ये जयश्री कॉलनी आणि निलगिरी पार्क सोसायटीत आज, सोमवार २ सप्टेंबर २०२४ रोजी, घरगुती डस्टबिनचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाद्वारे प्रभागातील ४००० हून अधिक घरांमध्ये डस्टबिनचे वाटप करण्यात आले आहे. नागरिकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले आणि आपल्या वॉर्ड व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.
मात्र, नागरिकांनी नोंदवलेल्या समस्या गंभीर आहेत. अहमदनगर महापालिकेच्या कचरा संकलनाच्या व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. घराघरात कचरा गोळा करण्यासाठी पुरेसे कचरा वाहन आणि मदतनीस उपलब्ध नाहीत, तसेच कचरा वाहन वेळेवर येत नाहीत. परिणामी, कचरा रस्त्यांवर आणि गल्लींमध्ये साचत आहे.
तसेच, २०१६ पासून महापालिकेचे अनेक सफाई कामगार निवृत्त झाले आहेत, परंतु नवीन सफाई कामगार आणि मदतनीस यांची नियुक्ती झालेली नाही. यामुळे रस्ते नियमितपणे स्वच्छता करण्यास अडचण येत आहे. यासाठी अहमदनगर महापालिका आणि आयुक्त यांची जबाबदारी आहे की ते नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात.
कचरा व्यवस्थापनाची स्थिती देखील गंभीर आहे. लँडफिलची स्थिती खराब असून कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण होत नाही. यामध्ये ९०% दोष महापालिकेचा आहे. जर महापालिका आणि आयुक्तांनी नागरिकांना योग्य सुविधा पुरवल्या तर, आपले शहर अधिक स्वच्छ होईल.
यावेळी कामत मॅडम, दिव्या दंडवानी, रावसाहेब राऊत, शशिकांत कुलकर्णी, पाटील पाटील, एस. बी चौधरी, प्रथमेश महिंद्रकर, राज गोरे, मस्के मॅडम व परिसरातील नागरिक उपस्थित होते