Saturday, October 12, 2024

किरण काळेंच्या पाठपुराव्यामुळे माथाडी कामगारांना मिळाले १ कोटी ८२ लाख रुपयांचे थकीत वेतन

कामगारांची दिवाळी होणार गोड, फटाकडे वाजवून गुलाल उधळत कामगारांनी केला एकच जल्लोष

प्रतिनिधी : अहमदनगर रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगारांच्या कोट्यावधी रुपयांच्या थकीत वेतन वसुलीचे प्रकरण आंदोलने, धरणे, मोर्चे यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलेच चर्चेत होते. काँग्रेस पक्षाच्या शहर माथाडी विभागाच्या वतीने सुमारे ५७८ कामगारांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्यात आला होता. अखेर या लढ्याला यश आले असून काळे यांच्या पाठपुराव्यामुळे माथाडी मंडळाच्या खात्यावर १ कोटी ८२ लाख रुपये जमा झाले आहेत. ही बातमी समजतात रेल्वे माल धक्क्यातील शेकडो कामगारांनी फटाकडे वाजून गुलाल उधळत एकच जल्लोष केला. यावेळी काळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणी दाखल याचिकेवर कामगारांचे आणि वेतन थकवणाऱ्या हुंडेकरी यांचे म्हणणे ऐकून १ एप्रिल २०२१ ते २५ एप्रिल २०२३ या कालावधीतील थकीत वेतन वसुलीच्या ४०% तर मे ते डिसेंबर २०२३ या कालावधीतील ६०% रक्कम कोर्टात भरण्याचे ठेकेदारांना निर्देशित केले आहे. त्यानंतर देखील प्रशासकीय स्तरावर दिरंगाई सुरू होती. मात्र काँग्रेस पक्षाने यासाठी काळे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच आज कामगारांची येऊ घातलेली दिवाळी गोड होणार आहे. आमच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचे नगर माथाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, शहर विभागाचे अध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांनी म्हटले आहे.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात शहर काँग्रेस कामगार आघाडीच्या वतीने महसूल विभाग, माथाडी मंडळाच्या विरोधात बायका, पोरांसह रस्त्यावर उतरत बाजारपेठेतून भव्य कामगार आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी व्यापारी, कामगारांनी एकमेकांना पाठिंबा दिला होता. अखेर कामगारांना न्याय मिळाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यावेळी सत्काराला उत्तर देताना किरण काळे म्हणाले, हा कामगार एकजुटीचा विजय आहे. कामगारांची व्यथा सरकारी पक्षाकडून मे. न्यायालयामध्ये यापूर्वी ताकदीने मांडली जात नव्हती. मात्र काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उबाळे, भिंगारदिवे यांच्या पुढाकारातून छेडण्यात आलेली तीव्र आंदोलने, निवेदने, सातत्यपूर्ण पाठपुरावा, मोर्चा याची दखल महसूल विभाग, माथाडी मंडळाला अखेर घ्यावी लागली. त्यामुळेच कोर्टा समोर यापूर्वी कधी न मांडलेले कामगार हिताचे महत्त्वपूर्ण मुद्दे यावेळी सरकारी पक्षाने जबाबदारीने मांडले. त्यामुळेच कामगारांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयाचे काँग्रेस व कामगारांच्या वतीने मी स्वागत करतो. सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांचे देखील अभिनंदन करतो. शहरातील कामगारांच्या पाठीशी सातत्याने खंबीरपणे उभे राहण्याचे काम इथून पुढील काळात देखील काँग्रेस करेल. काँग्रेसची दारे कामगारांसाठी ३६५ दिवस उघडी आहेत.

विलास उबाळे म्हणाले, भगवान के घर देर है, अंधेर नही. कामगार हा कष्टकरी आहे. त्याच्या घामाचे दाम त्याला मिळणं हा त्याचा अधिकार आहे. माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, किरण काळे यांनी कामगारांच्या मागे ताकद उभी केल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न सुटून कामगारांच्या माथाडी मंडळाच्या खात्यावर कोट्यावधी रुपये जमा झाले. अजूनही कोट्यावधी रुपयांचा वेतनाचा फरक कामगारांना मिळणे बाकी आहे. तो मिळवून देण्यासाठी काँग्रेस भक्कमपणे लढा देईल. सुनील भिंगारदिवे म्हणाले, ही कामगार आक्रोश मोर्चाची फलनिष्पत्ती आहे. या लढ्यात अनेकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. मात्र किरण काळे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.

यावेळी जयराम आखाडे, पोपट लोंढे, रोहिदास भालेराव, पंडित झेंडे, वसंत पेटारे, विलास गुंड, सागर पोळ, भगवान शेंडे, किशोर ढवळे, विजय वैरागर, दिपक काकडे, गणपत वाघमारे, बाबासाहेब वैरागर, देवराम शिंदे, किशोर जपकर, अनील जपकर, अनील कार्ले, संतोष भालेराव, संजय माळवे, कैलास कार्ले, सचिन वाघमारे, प्रशांत लक्ष्मण गायकवाड, बाळासाहेब अनारसे, बबन बनसोडे, अमर डाके, अंबादास कोतकर, राधेश भालेराव, नितीन भोंदे, सतीश शेंडे, मंगेश एरंडे, संतोष वाघमारे, सचिन लोंढे, अर्जुन जाधव, ईश्वर पवार, आतिश शिंदे, निलेश सोनवणे, नानासाहेब महारनवर, हरीभाऊ कोतकर, संदीप कार्ले, दिपक गुंड, ज्ञानदेव कदम, राजेंद्र तरटे, कौतीक शिंदे, संतोष गायकवाड, बबन डांगे, विजय कार्ले, विनोद केदारे, बाबासाहेब हजारे, आकाश ठोसर, नानासाहेब दळवी, संजय देठे आदींसह शेकडो कामगार सहभागी झाले होते.

किरण काळेंनी केला होता “पण” :
कामगारांसाठी गेल्या मागील दोन वर्षांपासून लढा काँग्रेस पक्ष लढत होता. मात्र लोकसभा निवडणूकी दरम्यान माथाडी कामगारांशी संवाद साधताना काळे यांनी पण केला होता की जोपर्यंत कामगारांच्या हक्काचे थकलेला कोट्यावधी रुपयांचा पहिला हप्ता माथाडी मंडळाच्या खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत रेल्वे माल धक्क्यात पाऊल ठेवणार नाही. मात्र मंडळाच्या खात्यावर कामगारांची हक्काची रक्कम जमा झाल्यानंतर काळे यांनी कामगारांच्या आग्रहाखातर धक्क्यामध्ये येत कामगारांच्या वतीने करण्यात आलेला जंगी सत्कार स्वीकारला. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, असे म्हणत यावेळी कामगारांनी काळे यांचे आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles