दिलीप वळसे-पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्या अनुभवाएवढे त्यांचे वय नाही, रोहित पवारांमुळे शरद पवार यांची साथ सोडली, असे म्हणत दिलीप वळसे-पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले की, माझी आणि रोहित पवारांची एकदा भेट झाली. तुमच्या मतदारसंघाचा प्रश्न असेल, तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि तुम्ही आंबेगाव विधानसभेतून उभे राहा. माझे कोणतंही भांडण नाही.
मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, रोहित पवारांचे वय 37 वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन 40 वर्षे झाली आहेत. माझा अनुभव पाहता त्यांचे वयही लहान आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की, साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवे. हा निर्णय घेतला असला तरी आपण कोणीही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. आपली राष्ट्रवादी स्वतंत्र राहणार आहे. त्याद्वारेच आपण आपलं काम करणार आहोत, साहेबांच्या कुटुंबाविरोधात कधीच जाऊ शकत नाही.