Sunday, December 8, 2024

शिर्डी महोत्‍सवाच्‍या कालावधीत तब्बल सोळा कोटींची देणगी

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, सरत्‍या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या दिनांक २३ डिसेंबर २०२३ ते दिनांक ०१ जानेवारी २०२४ याकालावधीत सुमारे ०८ लाखाहुन अधिक साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले तर याकालावधीत सुमारे १५.९५ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली.
श्री.हुलवळे म्‍हणाले, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त दिनांक २३ डिसेंबर २०२३ ते दिनांक ०१ जानेवारी २०२४ याकाळात आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या कालावधीत दानपेटीतून ०७,८०,४४,२६५/- रुपये, देणगी काउंटरव्‍दारे ०३,५३,८८,४७६/- रुपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डिडी व मनी ऑडरव्‍दारे ०४,२१,४०,८९३/- रुपये अशी एकुण १५ कोटी ५५ लाख ७३ हजार ६३४ रुपये देणगी रोख स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे. तसेच सोने ५८६.३७० ग्रॅम (रुपये ३२,४५,२९५/-) व चांदी १३ किलो ४१६ ग्रॅम (रुपये ०७,६७,३४६/-) देणगी प्राप्‍त झालेली आहे. अशाप्रकारे विविध माध्‍यमातुन एकुण १५ कोटी ९५ लाख ८६ हजार २७५ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झालेली आहे.
तसेच याकालावधीत श्री साईप्रसादालयात ०६ लाखाहुन अधिक साईभक्‍तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर सुमारे १ लाख २५ हजाराहुन अधिक साईभक्‍तांनी अन्‍नपाकीटांचा लाभ घेतला आहे. याबरोबरच ११,१०,६०० लाडु प्रसाद पाकीटांची विक्री करण्‍यात आली असून याव्‍दारे ०१ कोटी ४१ लाख ५५ हजार ५०० रुपये प्राप्‍त झालेले आहे. याबरोबरच ७,४६,४०० साईभक्‍तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला.
श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्राप्‍त झालेल्‍या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालय, श्री साईप्रसादालय मोफत भोजन, संस्‍थानच्‍या विविध शैक्षणिक संस्‍था, बाह्य रुग्‍णांना चॅरिटीकरीता, साईभक्‍तांच्‍या सुविधाकरीता उभारण्‍यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरीता करण्‍यात येत असल्‍याचे ही श्री.हुलवळे यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles