प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड
एकनाथराव ढाकणे संपादक ग्रामसेवा संदेश..यांना जाहीर*
तळमावले:
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने कला, सामाजिक,शैक्षणिक,साहित्य,वैद्यकीय,उद्योग,कृषी व क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था मंडळे यांना राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड देवून गौरवण्यात येणार आहे…..साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक…..या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल…. *ग्रामसेवा संदेश दीपावली विशेष अंकाचे संपादक एकनाथरावजी ढाकणे साहेब,सहसंपादक डॉक्टर राजेंद्र फंड* साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यांना…. प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड जाहीर झाला आहे.
पुरस्काराचे स्वरुप *सन्मानचिन्ह,मानपत्र,ग्रंथ आणि कोल्हापूरी फेटा* असे आहे.
2022 मधील पुरस्काराची घोषणा ट्रस्टचे डाॅ.संदीप डाकवे यांनी केली आहे.यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव सौ.रेश्मा डाकवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन प्रस्ताव मागवले होते.सुमारे 200 प्रस्तावामधून 30 व्यक्ती व संस्था यांची निवड केली आहे.
सदरील पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे.
या पुरस्कारांचे वितरण शनिवार दि.21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता यशवंतराव चव्हण स्मृती सदन (टाऊन हाॅल) कराड,ता.कराड,जि.सातारा येथे होणार आहे.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे,बिग बॉस फेम अभिनेते किरण माने,महाराष्ट्र केसरी पै.आप्पासाहेब कदम, प्रा.ए.बी.कणसे,कृष्णाकाठ न्यूज नेटवर्क चे चंद्रकांत चव्हाण,लिम्का बुक ऑफ होल्डर डाॅ.राजेंद्र कंटक,ह.भ.प.विजय महाराज,अभिनेता,लेखक सचिन पाटील,अभिनेत्री प्राजक्ता शिसोदे,अभिनेते नितीन गवळी, टीव्ही अँकर स्वाती गोडसे, अभिनेत्री डॉ.सीमा पाटील, अभिनेता प्रशांत बोगदार,डाॅ.संदीप डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. *एकनाथ रावजी ढाकणे साहेब हे ग्रामसेवकांचे राज्यातील नेते* असून ग्रामीण विकास चळवळीमध्ये अतिशय मौलिक कार्य केलेला आहे.कामगार चळवळीशी तीस वर्षाचा त्यांचा कनिष्ठ संबंध असून महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात त्यांचा चाहता वर्ग आहे.*एकच ध्यास ग्रामविकास* त्या ध्येयाने प्रेरित होऊन ग्रामसेवक चळवळी बरोबर त्यांनी त्यांनी केदारेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण भागात तंत्रशिक्षणामध्ये उच्च कामगिरी केलेली आहे.*हजारो विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करून* व्यवसायाच्या माध्यमातून नोकरीच्या माध्यमातून स्वयंपूर्ण बनवलेले आहे .त्याचबरोबर ग्रामसेवा संदेश मासिका द्वारे नवोदित कवी लेखक यांच्या माध्यमातून वास्तववादी चळवळीचे लिखाण प्रकाशित करणे,शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कथा आणि व्यथा प्रकाशित करण्यासाठी खुले व्यासपीठ या माध्यमातून निर्माण करणे,आणि दीपावली अंकाची निर्मिती गेल्या सतरा वर्षापासून महाराष्ट्रभर मोफत स्वरूपात वाटप करण्याची परंपरा चालू ठेवलेली आहे. दीपावली अंकाचा हातोहात वाचक वर्ग आहे.साहित्य क्षेत्रातील कवी लेखक यांची साहित्य संमेलन सुद्धा *एकनाथरावजी ढाकणे आणि सहसंपादक राजेंद्र फंड* यांनी अहमदनगर शहरात भरवले होते.त्याचबरोबर ढाकणे साहेबांनी ग्रामसेवक *प्रबोधन दिंडीच्या माध्यमातून अध्यात्म आणि ग्रामविकास चळवळ* यांची एकत्रित सांगड घालून पायी दिंडी सोहळा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन जनतेला समाजाला ग्रामसेवकांना जास्तीचे बळ मिळाले म्हणून आराधना करतात त्याचबरोबर कर्तव्यरूपी ग्रामविकास अधिकारी सेबीची *नोकरी करत असताना आदर्श ग्रामपंचायत आदर्श मॉडेल व्हिलेज वसुंधरा अभियान,स्मार्ट ग्राम योजना,जनता आणि शासन समन्वयक भूमिका घेऊन* गणोरे ग्रामपंचायत मॉडेल व्हिलेज बनवण्याचा ध्यास घेऊन परिपूर्ण काम करीत आहेत नुकतीच समाजसेवकांच्या पतसंस्थेच्या चेअरमन पदी अहमदनगर जिल्ह्यात निवड झालेली आहे.या पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामसेवकांना आर्थिक बळ देण्याचे कार्य बातमी साहेब अतिशय पारदर्शकपणे करतात. जिल्ह्यातील ग्रामसेवकांचा प्रचंड विश्वास या राज्य नेतृत्वावर आहे.