Saturday, October 12, 2024

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार यावं, एकनाथ खडसेंनी सांगितलं कारणं….

आमदार एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीचं सरकार यावं, असं वाटत असल्याचं म्हटलं. मागच्या काही दिवसांतील, काही महिन्यांमधील महायुतीचा अनुभव चांगला वाटत नाही.महायुती सरकार आल्याच्या पासून हे सरकार फोडाफोडीचे राजकारण करत आहे. सूडबुध्दीने ईडी सीबीआय सारख्या कारवाया करत आहेत. उट्टे काढण्याचं काम करत असल्याने जनतेची कामं होत नाहीत. लाडकी बहीण योजनेला 46 हजार कोटी द्या आणि त्यासोबतच 46 हजार कोटी रुपये धरणे, रस्ते निर्मितीसाठी द्या म्हणजे त्यातून स्थायी मालमत्ता निर्माण होईल. त्यामुळं हे सरकार जावे आणि महाविकास आघाडी सरकार यावे, असं आपल्याला वारंवार वाटत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

लाडकी बहीण योजना सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आणली असल्याचं जनतेलाही कळते,ही योजना आणायची होती तर पाच वर्ष पूर्वीच आणायला पाहिजे होती, असं एकनाथ खडसे म्हणाले. या योजनेला आपला विरोध नाही मात्र इकडे केलेला खर्च हा नॉन प्लॅन खर्च आहे, एवढाच खर्च जर धरणे उभारणी ,रस्ते निर्मिती साठी केला गेला तर त्यातून रोजगार ही निर्माण होऊ शकणार आहे, त्यासाठी ही प्रयत्न करायला हवं, असं एकनाथ खडसे म्हणाले

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles