Wednesday, February 28, 2024

महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघात सासरा विरुद्ध सून असा सामना होणार! दोघेही तयार….

रावेर लोकसभा मतदारसंघात सासरा विरुद्ध सून असा सामना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राष्ट्रवादीकडूनही त्यांना तिकीट देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे त्यांचीच सून आणि भाजपच्या रावेरमधील विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनीही तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात सासरा विरुद्ध सून असा सामना रावेरकरांना पाहायला मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे.
रावेर लोकसभेची जागा एनसीपीला मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. रावेरची जागा लढण्याबाबत मी सुद्धा इच्छुक आहे. रावेरची जागा मिळाली तर माझ्याच नावाचा प्राधान्याने विचार करावा, अशी विनंती मी पक्षाला केली आहे. पक्षानेही मला रावेर लढण्याबाबत सांगितलं आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनीही रावेरबाबत भाष्य केलं आहे. पक्षाने मला पुन्हा संधी दिली तर मी तिसऱ्यांदा खासदारकीची उमेदवार राहणार आहे. रावेरमधून लढण्याची माझी तयारी आहे. शेवटी पक्ष याबाबत काय निर्णय घेईल ते महत्त्वाचं असणार आहे, असं खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles